• Download App
    २७ ऑगस्टपासून नारायण राणे पुन्हा जन आशीर्वाद यात्रेवर; पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार यांना चिमटे पण... “संयमाने”|Narayan Rane on Jan Ashirwad Yatra again from 27th August; Tweaks to Chief Minister Uddhav Thackeray, Sharad Pawar at the press conference but ... "with restraint"

    २७ ऑगस्टपासून नारायण राणे पुन्हा जन आशीर्वाद यात्रेवर; पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार यांना चिमटे पण… “संयमाने”

    प्रतिनिधी

    मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे अटकेतून सुटल्यानंतर पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेवर निघणार आहेत. या यात्रेची माहिती देण्यासाठीच त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चिमटे काढले… पण “संयमाने”. त्यांच्या शेजारी आधीच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या संयमाची भलामण करणारे भाजपचे नेते आमदार आशिष शेलार बसले होते.Narayan Rane on Jan Ashirwad Yatra again from 27th August; Tweaks to Chief Minister Uddhav Thackeray, Sharad Pawar at the press conference but … “with restraint”

    २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल, असे नारायण यांनी जाहीर केले. नारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.



    नारायण राणे म्हणाले, की दोन्ही न्यायालयांचे निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचें राज्य आहे हे दिसून येते काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आले आहे. जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे

    गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्रिपद दिलं. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या. तुमच्या कामकाजाला सुरुवात करा. १९ ऑगस्टपासून मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये व्यत्यय येणार नाही.

    भाजपा माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस बाकी खासदार आमदार सर्वांचे मला पाठबळ मिळालं मी त्यांचा आभारी आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

    नारायण राणे यांनी या वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनाही चिमटे काढून घेतले. ते म्हणाले, की मी त्या दिवशी असे काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो….”

    असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. मला देशाबद्दल अभिमान आहे म्हणून ते सहन झाले नाही. त्यामुळे ते बोललो. ते रेकॉर्डवर आहे.” असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.

    शिवसेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचे थोबड तोडा. आदेश दिले. हा काय गुन्हा नाही… कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही का….”, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत उपस्थित केला. “हा योगी आहे की, ढोंगी चप्पलांनी मारले पाहिजे, हे त्यांचे विधान होते. हा काय त्यांचा सुसंस्कृतपणा आहे का… पवार साहेब, तुम्ही ज्यांना मुख्यमंत्री केलेत त्यांचा सुसंस्कृतपणा बघा…

    एका मुख्यमंत्र्याला म्हणातात चप्पलांनी मारला पाहिजे.”, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही लगावला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बद्दल उध्दव ठाकरे यांनी ते आक्षेपार्ह उद्गार काढले होते.

    Narayan Rane on Jan Ashirwad Yatra again from 27th August; Tweaks to Chief Minister Uddhav Thackeray, Sharad Pawar at the press conference but … “with restraint”

     

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल