विशेष प्रतिनिधी
नांदेड : मुंबईपासून ते राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वत्र स्वबळाचा नारा देत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने शिवसेनेला डिवचत आहेत. पुढील निवडणुकीत कॉँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हणून पटोले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची खोडी काढली आहे.Nana Patole once again lied about Shiv Sena, reiterating that Congress will be the Chief Minister in the state
नांदेड येथे बोलताना पटोले म्हणाले, भाजपाकडून जातीयवादी राजकारण केले जात आहे. त्यामुळे सर्व समाजाने भाजपाचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे. काँग्रेसची विचारसरणी सर्व समाजाला न्याय देणारी आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार आहे. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीत कोणताच सहभाग नव्हता.
त्यांनी धर्माच्या नावावर देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भोगावा लागला आहे. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच वाचवू शकतो. सर्वांनी एकत्र येत भाजपाचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे.
काँग्रेसच्या कार्यक्रमातून कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन नांदेडहून घेतलेली प्रेरणा, ऊर्जा आणि शक्तीच्या बळावर राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू आणि राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री करू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही व्यक्त केला आहे.
Nana Patole once again lied about Shiv Sena, reiterating that Congress will be the Chief Minister in the state
महत्त्वाच्या बातम्या
- घसरलेली जीभ आणि उगारलेले हात…!!
- ममता बॅनर्जी केंद्राविरोधात आक्रस्ताळ्या उड्या मारत राहणार…?? की उद्धव ठाकरे यांची “वाट” पकडणार…??
- दिशा सालियनच्या मारेकरी मंत्र्याला आत मध्ये घालू; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची नाव न घेता उघड धमकी
- पुण्यामध्ये पोटच्या दोन मुलांकडून आईचा छळ; कौटुंबिक अत्याचाराचा वेगळा धक्कादायक प्रकार