वज्रमुठ सभेच्या वेळी आजारी असणारे नाना 12 तासांत बरे; राहुल गांधींना भेटायला सुरतला रवाना!!

प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती संभाजी नगर मध्ये काल झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तब्येत बरी नसल्याने उपस्थित राहिले नव्हते पण आता नाना 12 तासांमध्ये बरे झाले असून ते काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींना भेटायला सुरतला गेल्याची बातमी आहे. Nana patole got well soon, meeting rahul Gandhi in surat today

राहुल गांधी यांनी देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्यानंतर सुरत कोर्टाने त्यांना 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार त्यांची खासदारकी रद्द झाली. आज राहुल गांधी हे मूळ प्रकरणाच्या फेरसुनावणीसाठी सुरतला येत आहेत. त्यांच्या वतीने वकिलांनी शिक्षेच्या फेरसुनावणीसाठी अर्ज केला आहे. राहुल गांधी हे सुरतला येत आहेत. त्यामुळे तिथे त्यांची भेट घेता येईल, असा होरा मनात ठेवून नाना पटोले सुरतला गेले आहेत.



पण कालच्या छत्रपती संभाजी नगर मधल्या वज्रमुठ सभेत ते तब्येतीचे कारण सांगून गैरहजर राहिले होते. मग अचानक नानांनी असे कोणते औषध घेतले की ते 12 तासांत बरे होऊन सुरतला रवाना झाले??, या प्रश्नावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Nana patole got well soon, meeting rahul Gandhi in surat today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात