मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यामुळे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.Mumbai : Coronation patients cannot be admitted in private hospitals without the permission of Municipal Corporation
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.दरम्यान कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यामुळे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेने रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही भरती होण्यासाठी कोरोनाबाधितां मुंबई महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागणार अशा सूचना खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.
खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सरकारने निर्देशित केलेले दर आकारणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.त्याचबरोबर बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, अशा सूचनाही पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.
Mumbai : Coronation patients cannot be admitted in private hospitals without the permission of Municipal Corporation
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App