अखेर एमपीएससीला मिळाला पूर्णवेळ अध्यक्ष, निवृत्त सनदी अधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांची मुख्य सचिवांकडून नियुक्ती


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदाची रिक्त जागा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता भरली आहे. 2003च्या बॅचचे सनदी अधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याविषयीची अधिसूनची 26 नोव्हेंबर रोजी काढली. MPSC finally gets President, Retired IAS Officer Kishore Raje-Nimbalkar appointed by Chief Secretary


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदाची रिक्त जागा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता भरली आहे. 2003च्या बॅचचे सनदी अधिकारी किशोर राजे-निंबाळकर यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याविषयीची अधिसूनची 26 नोव्हेंबर रोजी काढली.

सहा वर्षांसाठी नियुक्ती

एमपीएससीला पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेली होती. अखेर आता राज्य सरकारने याविषयी निर्णय घेतला असून निंबाळकर यांची सहा वर्षांसाठी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर राजे-निंबाळकर हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.

निंबाळकर यांच्यापूर्वी सतीश गवई हे आयोगाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. ते ऑगस्टमध्ये निवृत्त झाले. तेव्हापासून हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आले. ते निवृत्त झाल्यानंतर आता पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPSC finally gets President, Retired IAS Officer Kishore Raje-Nimbalkar appointed by Chief Secretary

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात