विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये एक व्यंगचित्र शहर करून टीका केली आहे. Marathi man deported from Mumbai, if not at home, who will forgive taxes ?; MNS sharp question
घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार? pic.twitter.com/Hy6RnwpraM — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 2, 2022
घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार? pic.twitter.com/Hy6RnwpraM
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 2, 2022
मुंबईतून मराठी माणूस तुम्ही वसई विरारला हद्दपार केला आहे. त्यांना घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार?, अशा शब्दांमध्ये मनसेने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोस्टल रोड, वरळी सी लिंक यामुळे मच्छीमार बांधव बेघर होणार आहेत. त्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे, अशा स्थितीत असल्या कर माफ्यांचा फायदा मराठी माणसाला होणारच कुठे आहे? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईचे पालकमंत्री विविध घोषणा करतील त्यावेळी मुख्यमंत्री आणि मनसे यांच्या त्या स्वरूपाचे ट्विटर वाॅर पाहायला मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App