• Download App
    भीषण अपघात; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यूMajor accident 8 people died after a private bus fell into a ravine on the old Mumbai Pune highway

    भीषण अपघात; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

    २० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या मार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ एक   खासगी बस पहाटे चार वाजता दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार सात ते आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, २० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत.  Major accident 8 people died after a private bus fell into a ravine on the old Mumbai Pune highway

    या बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. बस पुण्यावरून मुंबईच्या दिशेने निघाली होती, दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य तातडीने युद्धपातळीवर सुरू झाले.

    प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत २५ प्रवाशांना दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर अद्यापही जवळपास १५ पेक्षा अधिक प्रवासी अडकलेले आहेत.

    Major accident 8 people died after a private bus fell into a ravine on the old Mumbai Pune highway

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल