विशेष प्रतिनिधी
इगतपुरी : इगतपुरी शहरातील सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट, पोर्टर चाळ, आरपीएफ ब्यारेक, गावठाण परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे.सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट येथे काल रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने आपल्या३ बछड्यासह पुन्हा दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली.lepord is seen along with cubs in Igatpuri city
कामावरून येत असताना युवकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे,अशी मागणी होत आहे.इगतपुरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.
हा परिसर वर्दळीचा असून या पूर्वीही अनेकदा रात्री कामावर जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. पिंजरे लावले असतानाही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही. कामगार, शेतकरी वर्ग, विद्यार्थी धास्तावले आहेत.नागरिक बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App