• Download App
    केसीआर चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीची ममता बॅनर्जींपेक्षा मोठी "हवा"...!!। KCR Chandrasekhar Rao's visit to Mumbai has bigger "air" than Mamata Banerjee ... !!

    केसीआर चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीची ममता बॅनर्जींपेक्षा मोठी “हवा”…!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज मुंबईत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याआधी साधारण महिनाभरापूर्वी महिना दीड महिन्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत येऊन गेल्या होत्या, पण ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीपेक्षा केसीआर चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीची “हवा” जास्त आहे. KCR Chandrasekhar Rao’s visit to Mumbai has bigger “air” than Mamata Banerjee … !!

    मुंबईच्या रस्त्यांवर चंद्रशेखर राव यांच्या स्वागताचे मोठमोठे फलक लागले आहेत. या फलकांवर केसीआर चंद्रशेखर राव यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील झळकताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या मुंबईच्या भेटीच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या स्वागताचे फलक झळकलेले दिसले नव्हते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती तसेच त्या आधी त्यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती त्या वेळी उद्धव ठाकरे आजारी असल्याने ममता बॅनर्जी यांची अशी त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु, आता उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी असून त्यांनी आज केसीआर चंद्रशेखर राव यांना रात्रीच्या भोजनासाठी निमंत्रित केले आहे. चंद्रशेखर राव यांच्या बरोबर तेलंगण मधली शिष्टमंडळ देखील आहे.

    भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांचे ऐक्‍य साधण्यासाठी ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव हे दोन्ही मुख्यमंत्री समांतर प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या मुंबई भेटीतला फरक दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या पेक्षा चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीची हवा जास्त आहे जास्त असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब मध्ये आज मतदान होत असताना देशातली राजकीय हवा तापलेलीच आहे. यात मुंबईच्या राजकीय हवेची देखील भर पडली आहे.

    ठाकरे – चंद्रशेखर रावांची डिनर डिप्लोमसी!!

    भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या ऐक्याचा आज दुसरा अंक मुंबईत सादर होताना उद्धव ठाकरे आणि केसीआर चंद्रशेखर राव यांची मुंबईत आज रात्री “डिनर डिप्लोमसी” रंगणार आहे. केसीआर चंद्रशेखर राव हे शरद पवार यांची देखील भेट घेणार असून आपल्या मुंबई भेटीमध्ये ते भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय ऐक्याची बांधबंदिस्ती करणार आहेत.

    गेल्याच महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटून गेल्या त्यावेळी सिल्वर ओकच्या पोर्चमध्ये उभे राहून यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे अस्तित्व पुसून टाकले होते. मात्र त्यानंतर काँग्रेसने आक्रमक होत प्रादेशिक पक्षांच्या ऐक्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता.

    या पार्श्वभूमीवर केसीआर चंद्रशेखर राव हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याबरोबर तेलंगण मधले शिष्टमंडळ असेल. उद्धव ठाकरे यांनी त्यांना रात्रीच्या भोजनासाठी निमंत्रण दिले आहे. या मध्ये शरद पवार देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे ममता बॅनर्जी आणि केसीआर चंद्रशेखर राव यांचेही समांतर प्रयत्न सुरू आहेत आणि या दोन्ही प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरे सामील होताना दिसत आहेत.

    KCR Chandrasekhar Rao’s visit to Mumbai has bigger “air” than Mamata Banerjee … !!

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!