आव्हाड – वाघ ट्विटर वॉर; Baपूआर्मस्ट्राँग, एंटी चेंबर “विनोद” म्हणत जितेंद्र आव्हाडांचे वार; तर महिलेची बदनामी हेच तुमचे शस्त्र, चित्रा वाघांचा प्रतिघात

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांची चिखल फेक चालू आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड खालच्या स्तरावर येऊन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर वार केला आहे चित्रा वाघ यांनी देखील आव्हाड यांना टीका व्हिडिओद्वारे खणखणीत प्रत्युत्तर दिली आहे. jitendra avhad and chitra wagh tweeter war

राजकीय मुद्द्यांवर केलेल्या टीकेला उत्तर उत्तर नसले की महिलेची बदनामी आणि चारित्र्यहनन हे एकमेव शस्त्र तुमच्याकडे आहे. मी अशा अनेक प्रसंगांमधून गेली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड मी तुम्हाला पुरून उरेन. तुमच्यासारख्या लांडग्यांना मी घाबरत नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आव्हाड यांचे वाभाडे काढले आहेत.

या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात :

ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले “विनोद”…. आत्ता बस आपण खूप खालच्या पातळी वार जाऊन बोलता … माझा स्वभाव आपल्याला माहित आहे …मी सहन करतो … पण मला त्यांनी बोलावे ज्याचे हात स्वच्छ आहे …. अजून खूप बोलू शकतो …. बहिणीला संभाळून घेत आलो … पण……

चित्रा वाघांचे आधीचे ट्विट :

सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली… आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय.

jitendra avhad and chitra wagh tweeter war

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात