पुण्यामधील कोरोना रुग्णसंख्येत 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या 5 ते 6 दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.Increase in Corona patient population in Pune, resume school online; Mayor Muralidhar will make a demand to the Deputy Chief Minister
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.दरम्यान पुण्यामधील कोरोना रुग्णसंख्येत 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या 5 ते 6 दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गेल्या आठ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या चौपट झाली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.दरम्यान आज पुणे महापालिकेच्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
तसंच शाळा ॲानलाईन करावी अशी मागणी महापालिका करणार,दरम्यान क्वारंटाईनसाठी पुन्हा हॉटेल सुरु करणार,तसेच वाढीव निर्बंधाबाबत उद्या अजित पवारांसमोर चर्चा करणार त्यावेळी शाळांबाबत देखील चर्चा करणार असून पालकांची भुमिका ॲानलाईन शाळा सुरु करण्याची आहे असं त्यांनी सांगितलं.
पुढे मोहोळ म्हणाले की , नव्याने कोरोनाबाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जात असून बाधीत झालेल्या 309 पैकी 252 लोकांनी दोन्ही डोस घेतले असल्याचे समजत असल्याचही ते म्हणाले.तसेच ‘महापालिका कोरोना रुग्ण वाढले तरी परिस्थिती हाताळण्यास सुसज्ज आहे.दरम्यान जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासांत मशिनरी करण्याचे नियोजन गरज भासल्यास सुरु करणार’ असही ते म्हणाले.
Increase in Corona patient population in Pune, resume school online; Mayor Muralidhar will make a demand to the Deputy Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App