छगन भुजबळ यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसशी संबंधित “अल जबरिया कोर्ट” मालमत्ता जप्त; आयकर खात्याची कारवाई


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसशी संबंधित असणाऱ्या एका मालमत्तेची जप्ती आयकर विभागाने केली आहे.  Income-tax Department has provisionally attached the Al-Jabriya Court building at Marine Drive under the Benami Properties Act. The building was also probed by the ED in an alleged money laundering case against NCP leader Chhagan Bhujbal

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह वरील अल जबरिया कोर्ट ही इमारत आयकर विभागाने जप्त केली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर असलेल्या अनेक आरोपांपैकी
पैशाचा अफरातफरीचा म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा आहे. या पैशातूनच या इमारतीचा सौदा झाला होता आणि त्याचा आयकराशी संबंध आहे, असे स्पष्ट करून आयकर विभागाने बेनामी प्रोपर्टी अॅक्टचा वापर करून संबंधित मालमत्ता जप्त केली आहे.

छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेतच. आता मनी लॉन्ड्रिंग आरोपांसंदर्भात एका मालमत्तेची जप्ती होणे, यामुळे भुजबळ राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत.

शंभर कोटीच्या खंडणीखोरी प्रकरणात ठाकरे – पवार सरकारचे राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डोक्यावर इडी चौकशीची टांगती तलवार आहेच. त्यानंतर आता छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या केस मध्ये बेनामी प्रॉपर्टी ऍक्‍ट नुसार मालमत्ता जप्त झाल्याने ठाकरे – पवार सरकारच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत.

Income-tax Department has provisionally attached the Al-Jabriya Court building at Marine Drive under the Benami Properties Act. The building was also probed by the ED in an alleged money laundering case against NCP leader Chhagan Bhujbal

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात