• Download App
    सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांच्या एसटीवर अज्ञातांनी केली दगडफेक । In Sindhudurg, unknown persons hurled stones at students' ST

    सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांच्या एसटीवर अज्ञातांनी केली दगडफेक

    • एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक होण्याच्या घटना समोर येत आहेत. In Sindhudurg, unknown persons hurled stones at students’ ST

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : एसटी कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून संपावर आहेत.दरम्यान एसटी कर्मचारी राज्य शासनात विलिनीकरण कऱण्याच्या मागणीवर ठाम आहेत.तर काही कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत.दरम्यान एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना सिंधुदुर्गात घडली आहे.



    सिंधुदुर्गातील कणकवली येथून कळसुलीकडे निघालेल्या एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी ही दगडफेक केली आहे.सकाळी 8 वाजून 15 मिनिटांच्या आसपास ही घटना घडली आहे. बसमधून 30 विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत चालक कुमार तांबट यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

    In Sindhudurg, unknown persons hurled stones at students’ ST

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर