पुण्यातील सर्वात मोठ्या ई-टास्क फसवणुकीत निवृत्त कर्नलचे तब्बल अडीच कोटी बुडाले

सायबर भामट्यांनी ४८ बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले

विशेष प्रतिनिधी

पुणे :  सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असतात. अशाप्रकारे पुण्यातील एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यास या सायबर गुन्हेगारांनी तब्बल अडीच कोटींना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. असं म्हटलं जात आहे की आतापर्यंत शहरात यापेक्षा मोठा ऑनलाईन गुन्हा घडलेला नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. In Punes biggest e task scam a retired colonel lost nearly two and a half crores

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील म्हणाल्या, निवृत्त कर्नल यांचे वय ७१ वर्षे असून, ते बंडगार्डन परिसरात राहतात. त्यांनी सांगितले की व्हॉट्स अप त्यांना एक मेसेज आला होता, ज्यामध्ये व्हिडीओ लाईक करणे आणि रिव्ह्यू लिहण्यासाठी चांगले वेतन देण्यात येईल असे सांगितले होते. याशिवाय घरात बसून रिकाम्या वेळेत हे काम करण्यासारखे आहे आणि यातून मोबदलाही चांगला मिळेल असे मेसेजमधून  सांगण्यात आले होते.

पोलिसांनी सांगितले की,  सुरुवातीस सायबर गुन्हेगारांनी काही कामाबद्दल थोडाफार मोबदलाही दिला. यानंतर त्यांनी अधिक मोबदल्याचे अमिष दाखवून प्री-पेड टास्क स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. कर्नल यांनी या भामट्यांनी दिलेल्या ४८ विविध बँक खात्यांवर पैसे पाठवले. त्यांनी आपली सर्व बचत आणि निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम यामध्ये गुंतवली. यानंतर त्यांना लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे.

विशेष म्हणजे हे सगळं करत असताना कर्नल यांनी त्यांच्या कुटुंबाशीही चर्चा केली नाही. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि बँकांना संबंधित खाते गोठण्यास सांगितले, जेणेकरून त्यात शिल्लक असलेली रक्कम काढली जाणार नाही आणि त्यांना ती परत मिळेल. पोलिसांनी सांगितले की,  एफआयआरमध्ये सर्व मोबाईल क्रमांक आणि मेल नमूद करण्यात आले आहेत. ज्याद्वारे कर्नलशी संपर्क साधला जात होता. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

In Punes biggest e task scam a retired colonel lost nearly two and a half crores

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात