वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या खोऱ्याने पैसे खेचत असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले आहे. (या वृत्ताबाबतची सत्यता फोकस इंडियाने पडताळून पाहिलेली नाही)In Maharashtra, the farmers are poor, Butagri-business companies of Mahavikas Aghadis Ministers are Flourished day by day
नॅशनल क्राईम ब्युरोच्या २०१९ च्या अहवालानुसार राज्यात ३८ टक्के शेतकऱ्यांनी विविध कारणाने आत्महत्या करून जीवन संपविले. मात्र त्याच शेती उत्पादनांच्या सहाय्याने महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी कंपन्या स्थापन करून अनेक पिढ्यांची तरतूद करून घेतल्याचे उघड झाले आहे.
७६ टक्के मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापात्रात आपला उत्पन्नाचा स्रोत ‘ शेती व व्यवसाय’ असा केला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे १६१ कंपन्या असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी ४२ टक्के कंपन्या शेतीपूरक व्यवसायाशी निगडित आहेत.
ऍग्रो प्रॉडक्ट, ऍग्रो ट्रेड आणि ऍग्रोप्रोसेसिंग या नावाने कंपन्यांची नोंद केली आहे. एकूणच मंत्री स्वतःचा विकास करत असताना ते शेतकऱ्यांचा विकास का करू शकत नाहीत. शेतकरी का आत्महत्या करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वाधिक कंपन्या असलेले मंत्री
एक कंपनी असलेले मंत्री
तीन कंपन्या असलेले मंत्री
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App