प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.If Anil Parab runs away, who will give us justice? ; Praveen Darekar’s sharp question
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस वाढतच चालल आहे.आणि हे आंदोलन अजून वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान आज मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येनं जमले आहेत. या आंदोलनात आता भाजपनं देखील सहभाग घेतलाय.प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.
पुढे दरेकर म्हणाले की , सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका.आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांच्याच जीवावर मोठे झाले झालय.आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या.आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 वेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App