प्रेमसंबंधातील आर्थिक वादातून ४६ वर्षीय प्रियकराने ४४ वर्षीय प्रीयेसी महिलेचे डाेके भिंतीवर आपटून तिचा खून केला. त्यानंतर घरातील कपडे, भांडीसह इतर वस्तू अस्ताव्यवस्त करुन तिच्या अंगावरील साेन्याचे दागिने, तिचा माेबाईल त्याने चाेरी करुन पळवून नेत घरफाेडी झाल्याचा बनाव केला. मात्र, पाेलीसांच्या तपासात संबंधीत घटना घरफाेडीतून खूनाची नसून प्रेमसंबंधातील आर्थिक वादातून झाल्याचे उघडकीस आले आहे.Hadapsar area economic clashesh between seniorage lovers and women murder
विशेष प्रतिनिधी
पुणे -प्रेमसंबंधातील आर्थिक वादातून ४६ वर्षीय प्रियकराने ४४ वर्षीय प्रीयेसी महिलेचे डाेके भिंतीवर आपटून तिचा खून केला. त्यानंतर घरातील कपडे, भांडीसह इतर वस्तू अस्ताव्यवस्त करुन तिच्या अंगावरील साेन्याचे दागिने, तिचा माेबाईल त्याने चाेरी करुन पळवून नेत घरफाेडी झाल्याचा बनाव केला.
मात्र, पाेलीसांच्या तपासात संबंधीत घटना घरफाेडीतून खूनाची नसून प्रेमसंबंधातील आर्थिक वादातून झाल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी हडपसर पाेलीसांनी आराेपी किसन सिताराम जगताप (वय-४६,रा.बेलसर,नारळीचा मळा, ता.पुरंदर,पुणे) यास अटक केली आहे.
यासंर्दभात महिलेच्या २४ वर्षीय विवाहित मुलीने हडपसर पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित खून झालेली महिला व तिच्या मुली व जावईसह पुण्यातील वैदूवाडी परिसरात राहण्यास हाेती. सदर विवाहित महिलेची किसन जगताप याच्याशी मागील दहा वर्षापासून ओळख झाली हाेती व त्यांच्यात प्रेमसंबंध हाेते.
आराेपी किसन जगताप हा पूर्वी कारचालक म्हणून काम करत हाेता परंतु काेराेनानंतर ताे सेट्रिंगची कामे करु लागला हाेता तर संबंधित महिला घरकामाची कामे करत हाेती. मागील काही दिवसांपासून सदर महिला ही आराेपीकडे पैशांची मागणी करत हाेती. त्यातून दाेघांमध्ये वाद झाल्यानंतर किसन जगताप याने महिलेचे डाेके भितींवर आपटून तिचा खून केला.
त्यानंतर घरफाेडीचा बनाव करत तिच्या अंगावरील १५ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, तिचा माेबाईल व एसीबीआय बँकेचे एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन ताे पसार झाला हाेता. याबाबतची माहिती पाेलीसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आराेपीचा शाेध सुरु करत त्यास जेरबंद केले आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलीन निरीक्षक विजय शिंदे करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App