• Download App
    हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते केले म्हणणारे गुलाबराव पाटील तोंडावर पडले, जोरदार टीकेनंतर मागितली माफी|Gulabrao Patil, who claimed to have done Hema Malini's cheek-like road, fell on his face, apologized after strong criticism

    हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते केले म्हणणारे गुलाबराव पाटील तोंडावर पडले, जोरदार टीकेनंतर मागितली माफी

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याप्रमाणेच वक्तव्य केल्याने शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच तोंडावर पडले आहेत. मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालाप्रमाणे बनविले असे म्हणणाऱ्या पाटील यांना जोरदार टीकेनंतर माफी मागावी लागली.Gulabrao Patil, who claimed to have done Hema Malini’s cheek-like road, fell on his face, apologized after strong criticism

    शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील बोदवड येथील प्रचारसभेत एकनाथ खडसे यांना टोला लगावताना पाटील यांची जिभ घसरली. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. माझे आव्हान आहे 30 वर्ष राहिलेल्या आमदाराला. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पहावे की मी कसा विकास केला आहे.



    माझ्या धरणगावला या आणि तेथिल रस्ते पाहा. सर्व रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन.भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून गुलाबराव पाटील यांना टोल लगावला आहे.

    गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसतात, असा आरोप त्यांनी केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गुलाबराव पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल झाला नाही तर गाल पाहणाºयांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.

    त्या म्हणाल्या, गुलाबराव पाटील हा रांज्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना नेमकं काय झालंय? संजय राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलंय.

    गुलाबराव पाटील आणि रांज्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांज्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती. पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे.

    Gulabrao Patil, who claimed to have done Hema Malini’s cheek-like road, fell on his face, apologized after strong criticism

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा