प्रतिनिधी
नाशिक : नाशिकचे सुप्रसिद्ध काळाराम मंदिर परिसरात उत्साहात गुढी पूजन करण्यात आले. नव वर्ष स्वागत समितीच्या वतीने पारंपरिक गुढी उभारून आज पहाटे भारत मातेचे देखील पूजन करण्यात आले. Gudi Pujan in the Kalaram temple area of Nashik
यावेळी पुरोहित वर्ग तसेच नववर्ष स्वागत समितीचे सचिव जयंत गायधनी व अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या वादनाने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
नाशिक शहरात ठिकठिकाणी जल्लोषात नववर्षाच्या मिरवणूका काढण्यात आल्या. यामध्ये हजारो युवक-युवती पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे नववर्ष स्वागताच्या मिरवणुका निघाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर यंदा सगळीकडे मोठा जल्लोष दिसला. काळाराम मंदिर परिसर, भद्रकाली मंदिर परिसर, रविवार कारंजा नाशिक शहराच्या परिसरात तसेच पंचवटीत उत्साहात मिरवणुका निघाल्या.
भद्रकाली मंदिर परिसर साक्षी गणपती जवळ पूजन करण्यात आले यामध्ये स्वागत समितीचे प्रमुख प्रफुल्ल संचेती इतिहास संकलन समितीचे प्रमुख प्रफुल्ल संचेती, भद्रकाली मंदिराचे मुख्य पुजारी मंदार कावळे आदी सहभागी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App