आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

विशेष प्रतिनिधी

पुणे : इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. काहींची नोंद झाली काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक. Greetings to the early revolutionary Narveer Umaji Naik

नरवीर उमाजी नाईक यांना न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली ३ फेब्रुवारी १८३२ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील कारागृहात (सध्या मामलेदार कचेरी) वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत फाशी गेले.



उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते . गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या आद्य क्रांतीवीराला विविध संघटनांतर्फे गुरुवारी अभिवादन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी, पुणे तर्फे उमाजी नाईक यांचा 190 व्या पुण्यतिथी निमत्ती मामलेदार कचेरी शुक्रवार पेठ पुणे येथील अर्धपुतळ्याला मुन्वरभाई कुरेशी (शहर अध्यक्ष) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक रामोशी राज्य संघटना अध्यक्ष अप्पा चव्हाण संयोजक दिपक ओहोळ, जितेंन्द्र जाधव,महेश कांबळे, विवेक लोंढे,बाळासाहेब बनसोडे अनिता छत्रे, किरण चव्हाण,संपत भाकर आदी उपस्थित होते.

Greetings to the early revolutionary Narveer Umaji Naik

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात