शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनाशून्य, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला उर्जामंत्र्यांकडून हरताळ, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सरकार मुंबईच्या बिल्डरांना कोट्यावधी रुपयांची सूट देऊ शकते. प्रीमियमध्ये सूट देऊ शकते, दारू विक्री करणाऱ्यांना सुट देते, बेवड्यांसाठी पॉलिसी तयार करू शकते पण हे सरकार शेतकऱ्यांना सुट देत नाही. सरकार संवेदनशुन्य आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला ऊजार्मंत्री हरताळ फासतात हेही गंभीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Government is insensitive towards farmers, energy minister against Deputy CM’s assurance, Devendra Fadnavis alleges

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांनी एवढीच विनंती केली, की सातत्याने नापिकी आहे. ओला, सुका दुष्काळस्थितीमुळे विजेच्या बिलाची थकबाकी आहे. वीज कनेक्शन कापू नका. तरीही सरसकट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विजेचं कनेक्शन कापणं सुरू आहे.



हे योग्य नाही. सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करून, मला आता जगण्यात रस नाही, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे असे सांगत आत्महत्या केली. सुरज जाधव यांचे वीज कनेक्शन या सरकारने कापले होते.

सुरजच्या मृत्यूनंतर सरकारला जाग यायला हवी होती, पण सरकारने असंवेदनशिलता दाखविली असा आरोप फडणवीस यांनी केला. सरकारने सभागृहातून पळ काढल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केली.

Government is insensitive towards farmers, energy minister against Deputy CM’s assurance, Devendra Fadnavis alleges

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात