मेघर्जनेसह कोसळणार पाच दिवस पाऊस; पुण्यासह मुंबई-ठाण्यासाठी हवामान खात्याचा इशारा

वृत्तसंस्था

पुणे : महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित केला आहे. दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातही पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. Five days of rain with thunderstorms; Meteorological Department warning for Mumbai-Thane including Pune



पुढचे ५ दिवस दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह व कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता असून मुंबई ठाणे परिसरात हलका पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील काही तासांत जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग ४० किमी प्रतितास असेल. रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या चार जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामान आहे. पुढील काही तासात या जिल्ह्यातपावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील चार राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.

Five days of rain with thunderstorms; Meteorological Department warning for Mumbai-Thane including Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात