ED Actions : हसन मुश्रीफ, अनिल परब यांच्या विरोधात ईडी, सहकार मंत्रालय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे खटले दाखल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि सहकार मंत्रालय यांनी खटले दाखल केले आहेत. ED Actions: Cases filed against Hasan Mushrif, Anil Parab by ED, Ministry of Co-operation, Income Tax Department

अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणात त्यांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी करण्यात आले आहे, तर हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीय तसेच कुटुंबीयांच्या मालकीच्या शेल कंपन्या यांच्याविरोधात ईडी, सहकार मंत्रालय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांनी पुणे सत्र न्यायालयात खटले दाखल केले आहेत. या खटल्याचे तपशील भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवर जाहीर केले आहेत.



हसन मुश्रीफ यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला असून त्यांनी हजारो कोटींचा आर्थिक घोटाळा केला आहे. त्याविरोधात केंद्र सरकारने हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयां विरुद्ध पुणे कोर्टात खटला दाखल केला आहे शील कंपन्यांमधून मनी लॉटरी झाले असल्याने या कारवाईमध्ये सहभागी होणार आहेत आज पासून ही कारवाई सुरू झाली आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

मुश्रीफ आणि परब यांनी केलेल्या घोटाळ्यांसंदर्भ सरकारकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली असून सुरूवातीला 158 कोटींचा घोटाळ्याप्रकरणी ईडी, कंपनी मंत्रालय, प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाईल, अशी शक्यताही सोमय्यांनी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी आज पुणे दौऱ्यावर आहेत.

– अनिल परबांवर खटला

अनिल परब यांनी साई रिसॉर्टचे संबंध नाकारला आहे. परंतु केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेत त्यांना प्रथम क्रमांकाचे आरोपी ठरवले असून या खटल्याची 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. परब यांनी खरमाटे आणि सचिन वाझेंकडून पैसे घेतले आणि रिसाॅर्ट बांधला. कोविडच्या नावाखाली, घोटाळा केला. परबांनो बॅग भरा तयारी करा, असेही सोमय्या म्हणाले.

ED Actions : Cases filed against Hasan Mushrif, Anil Parab by ED, Ministry of Co-operation, Income Tax Department

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात