वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत निरंतर वाढ होत आहे. शनिवार 53 हजार जण कोरोनामुक्त झाले असून 55 हजार 411 जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. Corona on 55,000 people in the state on Saturday
कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी कमी होत नाही. त्यात शनिवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण 27,48,153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 % एवढे झाले आहे.
कोरोना बाधितांचा मृत्यदूर कमी
राज्यात शनिवारी 309 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यदूर 1.72% आहे. आजपर्यंत तपासलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईन तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबई महापलिका क्षेत्रात आज 9330 रुग्णांची नोंद झाली.