• Download App
    राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे नुकसान ।Unseasonal rains hit many parts of the state; Crop damage

    राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे नुकसान

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारपासूनच सिंधुदुर्गासह राज्यातील तुरळक भागांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर विदर्भाकडेही पावसाने मोर्चा वळविला. शनिवारी हिंगोली, वाशिम, चंद्रपूर या भागात पाऊस पडला. मुंबईतही काही ठिकाणी सरी बरसल्या.  Unseasonal rains hit many parts of the state; Crop damage

    आंबोलीत 40 वर्षांत पहिल्यांदाच… 

    कोकणातील काही भागांत एप्रिलमध्ये पाऊस पडण्याची घटना अनेकांसाठीच नवी होती. मंगळवारी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या आंबोलीकरांना दिलासा मिळाला. मागील 40 वर्षांत आतापर्यंत एप्रिलमध्ये आंबोलीत पहिल्यांदाच पाऊस पडला.

    वाशीम जिल्ह्यात पिकांचे नुकसान

    वाशिम जिल्ह्यात शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणार आहे. अशा वातावरणामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शेतीचेही काही प्रमाणात नुकसान होणार आहे. आंबा, टरबूज, खरबूज, काकडी आणि फळभाजी पिकाला फटका बसणार आहे.

    वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू  

    हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावाच्या शिवारात शेतकरी लक्ष्मण नारायण तांबिले (४५) हे हळदीचे पिक झाकण्यासाठी गेले. या पिकावर ताडपत्री टाकताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    Unseasonal rains hit many parts of the state; Crop damage

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!