• Download App
    पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करा ! , उच्च न्यायालयाची सरकारला सूचना; वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता | complete lockdown in Pune! , High Court notice to Government; Concerns about the growing number of patients

    पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करा ! , उच्च न्यायालयाची सरकारला सूचना; वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता

    वृत्तसंस्था

    मुंबई : पुण्यातील वाढत्या रूग्णसंख्येवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली असून उद्रेक रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करायलाच हवे, आम्हाला मात्र तसे आदेश द्यायला भाग पाडू नका ,असे मुख्य न्यायमूर्तींनी बजावले आहे. complete lockdown in Pune! , High Court notice to Government; Concerns about the growing number of patients

    पुण्यात कोरोनाचा कहर झाला असून एक लाखापेक्षा जास्त रुग्ण आहेत, ही बाब चिंतेची असल्याबद्दल सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातल्या रुग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा याप्रकरणी स्नेहा मरजादी यांनी ऑड. अर्शिल शहा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.



    या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पुण्यातील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

    कोरोना रोखण्यासाठी पुण्याने मुंबईचा आदर्श घ्यावा, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांनी मुंबई पालिका आयुक्तांची त्यासाठी मदत घेतली पाहिजे, असे न्यायमूर्ती यांनी सांगितले.

    मुंबईत 56 हजाराच्या आसपास रुग्णसंख्या असताना पुण्यात मात्र ती दुप्पट आहे. त्यामुळे सरकार पूर्ण लॉकडाऊन का करत नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

    complete lockdown in Pune! , High Court notice to Government; Concerns about the growing number of patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना