Eknath Shinde : ‘जय गुजरात’वर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण; उद्धव ठाकरेंनेही तसेच म्हटल्याचा व्हिडिओ दाखवला
अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील येत असून जोरदार टीका केली जात असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.