रडू नका, अन्यायाविरोधात लढा; आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत; भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पारनेर तहसीलदार देवरे यांची भेट

वृत्तसंस्था

अहमदनगर : रडू नका, अन्यायाविरोधात लढा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना सांगितले. Chitra Wagh verbal attack on MLA Nilesh Lanke over Parner Tehsildar Jyoti Devare issue

पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू, अशी ऑडिओ क्लिप पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी जारी केली होती. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट भेट घेतली व त्यांना धीर दिला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार निलेश लंके यांचा नुकताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो समोर आला होता. त्यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली होती. त्यांनी ट्विट करत निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “कमाल आहे. निलेश लंके यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघारची बातमी छापून आणली.



“ओ लंके, २०० पाऊलं पुढे जात ठोकणार”

“ओ लंके, ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. दोन पावले माघार घेतं नाही, तर २०० पाऊलं पुढे जात ठोकणार आहे हे हे ध्यानात ठेवा. आम्ही सगळे ज्योतीताई देवरेच्या मागे सक्षमतेने उभे आहोत,” असं सांगत चित्रा वाघ यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं.

बेलगाम घोड्यांना वेसण केव्हा घालणार ?

“ ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.

दरम्यान, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. देवमाणूस म्हणून वापरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचं आहे. नाहीतरी या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला होता.

Chitra Wagh verbal attack on MLA Nilesh Lanke over Parner Tehsildar Jyoti Devare issue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात