• Download App
    आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच, जलसंपदाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा Bribe sought for approval of medical bill of an employee of his own office, crime against Deputy Engineer

    आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच, जलसंपदाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या जलसंपदा विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bribe sought for approval of medical bill of an employee of his own office, crime against Deputy Engineer

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्याचा संशय आल्याने हा अधिकारी लाच न घेताच तेथून निसटला.

    संजय नारायण मेटे आणि पोपट दशरथ शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. मेटे हा भीमा उपसा सिंचन प्रकल्प, पळसदेव येथे नेमणुकीस आहे. तर, शिंदे हा खासगी व्यक्ती या प्रकरणात सहभागी होता.



    त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचार्यांचे वैद्यकीय बिल होते. ते मंजूर करण्यासाठी मेटे याने पाच हजार रुपयांची मागणी केली. या कर्मचाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

    Bribe sought for approval of medical bill of an employee of his own office, crime against Deputy Engineer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा