वृत्तसंस्था
मुंबई : ठाकरे – पवार सरकारने दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपाचे जे 12 आमदार निलंबित केलेत त्यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. जुलै महिन्यातल्या अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी सभागृहाच्या तालिका अध्यक्षांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांनी भाजपाच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केले होते. आता याच 12 भाजपा आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. BJP 12 disqulified MLAs to participate in voting for rajaya sabha election in maharashtra
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेतील त्यांची जागा रिक्त आहे. त्यामुळे या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी मतदानात सहभाग घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भाजपाच्या या 12 निलंबित आमदारांना देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तसे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपाला पोटनिवडणुकीत या 12 आमदारांच्या मतदानाचा फायदा होणार आहे.
डॉ. संजय कुटे (जामोद, जळगाव), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अभिमन्यू पवार (औसा, लातूर), गिरीश महाजन (जामनेर, जळगाव), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व, मुंबई), पराग अळवणी (विलेपार्ले, मुंबई), हरिश पिंपळे (मूर्तिजापूर, अकोला), राम सातपुते (माळशिरस, सोलापूर), जयकुमार रावल (सिंदखेडा, धुळे), योगेश सागर (चारकोप, मुंबई), नारायण कुचे (बदनापूर, जालना), कीर्तिकुमार भांगडिया (चिमूर, चंद्रपूर) हे १२ आमदार मतदानात सहभागी होणार आहेत.
काँग्रेसकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून संजय उपाध्याय हे उमेदवार असणार आहेत. ही पोटनिवडणूक 4 ऑक्टोबर रोजी होणार असून, त्याच दिवशी दुपारी मतमोजणी करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App