मोठी बातमी : जालना – जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी रेल्वे प्रशासनाकडून मान्यता, ४.३५ कोटींची तरतूद

Big News Approval from Railway Administration for final survey of Jalna-Jalgaon railway line, provision of Rs 4.35 crore

Jalna-Jalgaon railway line : मागच्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जालना- जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला रेल्वे प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने १७४ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग-व्यापाराच्या दृष्टीने जालना आणि जळगाव मोठी बाजारपेठ असल्याने या रेल्वे मार्गाचा फायदा या दोन्ही वर्गांना होणार आहे. Big News Approval from Railway Administration for final survey of Jalna-Jalgaon railway line, provision of Rs 4.35 crore


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मागच्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जालना- जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला रेल्वे प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने १७४ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग-व्यापाराच्या दृष्टीने जालना आणि जळगाव मोठी बाजारपेठ असल्याने या रेल्वे मार्गाचा फायदा या दोन्ही वर्गांना होणार आहे.

जालना येथे असलेले स्टील आणि बियाणे उद्योग यांचा देशभरात व्यवसाय आहे. येथे तयार होणारी लोखंडी सळई आणि बियाणे ट्रकद्वारे जळगाव, नागपूर, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांत पाठवले जातात. या वाहतुकीचा रेल्वेला मोठा फायदाच होऊ शकतो. या रेल्वेमार्गावर अजिंठा लेणीसारखे पर्यटन स्थळ येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीनें रेल्वेच्या उत्पन्न वाढीत ही मोठा फायदा होऊ शकतो.

हा रेल्वे मार्गा झाल्यास मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योग, पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार आहे. हा रेल्वे मार्ग पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा जात आहे आणि याचा फायदा पुढे सुरत, गुजरात, राजस्थानच्या रेल्वेगाड्यांना आंध्र प्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.

Big News Approval from Railway Administration for final survey of Jalna-Jalgaon railway line, provision of Rs 4.35 crore

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात