आजच्या काळामध्ये औषधांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलाय कारण विविध आजारांचं प्रमाण वाढलंय. पण कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी मूळ महत्त्वाची असते तुमची प्रतिकारशक्ती. कोरोनाच्या संकटानं तर याची चांगलीच जाणीव आपल्याला करून दिली आहे. पण ही प्रतिकारशक्ती आता कमी का होत आहे. त्याचं कारण म्हणजे आपण आहाराच्या अनेक चांगल्या जुन्या सवयीच सोडल्या आहेत. त्यामुळं पूर्वीच्या लोकांना जी पोषक तत्वे मिळायची ती आज आपल्याला मिळत नाहीत. अशीच एक सवय म्हणजे भिजलेला हरभरा खाण्याची. पूर्वी अनेक घरांमध्ये किंवा प्रामुख्यानं ग्रामीण भागांतही सकाळी-सकाळी भिजलेले चने खाल्ले जायचे. त्याचे फायदेही अनेक होते. रात्री भिजवून सकाळी हरभरा खाल्ल्यास आरोग्याला फायदो होतोच शिवाय वजन कमी करण्यासही मदत होते. अनेक पौष्टीक तत्वं त्यात असतात. benefits of eating soaked gram in morning increases immunity
हेही पाहा –
- WATCH : आता टाटाने मागवले ऑक्सिजन वाहतुकीसाठीचे 24 क्रायोजेनिक कंटेनर
- WATCH : असा आहे इस्राईलनं कोरोनासाठी तयार केलेला नेझल स्प्रे
- WATCH : मोदींनी तरुणांना दिली ही जबाबदारी, समाजासाठी फायदेशीर ठरू शकतो प्रयोग
- WATCH : काळजी घ्या, बेड अडवू नका! डॉक्टरांनाही अनावर होतायत भावना
- WATCH : लसीकरणाबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?