• Download App
    स्मिता, निहार बरोबरच ठाकरे कुटुंबातील खरे शिवसैनिक शिंदे गटात येणार : खासदार राहुल शेवाळे Along with Smita, Nihar, the true Shiv Sainiks of the Thackeray family will join the Shinde group

    स्मिता, निहार बरोबरच ठाकरे कुटुंबातील खरे शिवसैनिक शिंदे गटात येणार ; खासदार राहुल शेवाळे

    प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदरांना घेऊन केलेल्या उठावानंतर शिवसेनेचे खासदारही आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यावरुनच आता त्यांच्यावर टीका होत असताना आता शिंदे गटाचे लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. Along with Smita, Nihar, the true Shiv Sainiks of the Thackeray family will join the Shinde group

    स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला शनिवारी शेवाळे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांसोबत चालणारे आमच्यासोबत येत असल्याचे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान पोस्टने ही मुलाखत घेतली आहे.

    – विचारांचा वारसा पुढे नेणार

    बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू निहार ठाकरे आणि सून स्मिता ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील खरे शिवसैनिक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत असल्याचे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. ते केवळ आमच्यासोबत नाहीत तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वाच्या विचारांसोबत येत आहेत. ही लढाई विचारांची आहे आणि हा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ते आमच्यासोबत येत असल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे.

    – आदित्य ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे

    आदित्य ठाकरे यांनी खासदार आणि आमदारांना केलेल्या आव्हानालाही खासदार राहुल शेवाळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपलं आत्मपरिक्षण करायला हवं. वरळी विधानसभेतील मतदारांनी आदित्य ठाकरेंना शिवसेना-भाजप युतीमुळे निवडून दिले आहे. त्यामुळे या मतदारांचा सन्मान न राखता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. त्यामुळे याबाबतचं आत्मपरिक्षण करण्याची आदित्य ठाकरे यांना गरज असल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे.

    Along with Smita, Nihar, the true Shiv Sainiks of the Thackeray family will join the Shinde group

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा