प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “बारा – बारा”चा संबंध आज तोडून टाकला. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे एकत्र चहापान झाले. विरोधी भाजपने त्यावर बहिष्कार घातला होता. Ajit Pawar breaks ties with 12
त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या विषयाशी भाजपचा बारा आमदारांच्या निलंबनाचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने सुचविलेल्या बारा आमदारांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी अद्याप विधान परिषदेवर केलेली नाही म्हणून महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या बारा आमदारांचे विधानसभेत निलंबन करून त्याचा राजकीय बदला घेतला, असे बोलत आहेत. परंतु ह्या बाराचा आणि त्या बाराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले.
पण विधानसभेतल्या आणि विधान परिषदेच्या या बाराचा आणि त्या बाराचा संबंध नसला, तरी राज्यसभेत देखील बारा खासदार गैरवर्तनाबद्दल सभापती निलंबित केले आहेत. त्यामुळे तिसऱ्या बारांचे नेमके काय?, हा प्रश्न कोणी विचारला नाही. त्यामुळे त्याचे उत्तरही आले नाही. राज्यसभेच्या बारांचा प्रश्न त्यामुळे महाराष्ट्राच्या पातळीवर तरी अधांतरी राहिला आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App