प्रतिनिधी
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्ताने ष्णमुखानंद हॉलमध्ये आज जी राजकीय आतषबाजी झाली, त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे भाषण विशेषत्वाने गाजले. त्यांनी छगन भुजबळांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेबद्दल भाष्य करतानाच शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेबद्दलही भाष्य करून घेतले. दोघांचे कर्तृत्व मोठे आहे, पण काहींच्या नशिबात योग नसतो, असे सांगून अजितदादांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या राजकीय जखमांवरील खपली काढली!!Ajit Pawar blame it on fortune, that sharad Pawar couldn’t become prime minister and chagan bhujbal couldn’t become chief minister
अजितदादांनी भुजबळांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात एक अनेकांच्या भुवया उंचवणारे विधान केले, तेव्हा व्यासपीठावर शरद पवार देखील हजर होते. अजितदादांनी भुजबळांना शुभेच्छा देताना 1999 मध्ये आणखी चार महिने मिळाले असते तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, असे विधान केले. पण अजितदादा इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट शरद पवारांची महत्त्वाकांक्षा बोलून दाखविली. आम्हालाही पवार साहेब पंतप्रधान म्हणून बसावेत, असे वाटत होते. पण तसे झाले नाही, काही व्यक्तींच्या नशिबात योग नसतो!!, हे वक्तव्य अजितदादांनी करताच सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही क्षणातच सभागृहात हशा झाला. यावेळी पवारांच्या उजव्या बाजूला बसलेल्या भुजबळांनी हसतच डोक्याला हात लावला, तर शरद पवारांच्या डाव्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरेंनाही हसू आवरले नाही. त्यांनी तोंडासमोर हात आडवा धरून आपले हसू झाकण्याचा प्रयत्न केला.
पण शरद पवारांनी मात्र चेहऱ्यावर कुठलेही हावभाव न दाखवता हातातील रुमालाने फक्त आपला चेहरा पुसला आणि आपल्या बद्दल कुणी काही बोललंच नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न केला!!
उद्धव ठाकरेंचाही भुजबळांना चिमटा
छगन भुजबळ यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही, हीच संधी साधत उद्धव ठाकरेंनी देखील भुजबळांना चिमटा काढत शिवसेना सोडली नसती तर मुख्यमंत्री कधीच झाला असता असा टोला लगावला.
तर राज्याच्या प्रमुखपदापासून ते देशाच्या कृषि आणि संरक्षण खात्याचा कार्यभार शरद पवार यांनी सांभाळला आहे. मात्र, पंतप्रधानपदाने त्यांना हुलकावणी दिल्याचे अजित पवारांनी आज जाहीर बोलून दाखविले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App