तीन वाजेनंतर संजय राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील, सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटलांना म्हणाल्या- दादा आताच आपली पब्लिसिटी करून घेऊ!


बहुत बर्दाश्त किया, अब बर्बाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. याच अनुषंगाने आज संध्याकाळी चार वाजता ते मुंबईतील शिवसेना भवनात स्फोटक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. After three o’clock Sanjay Raut will take over all the channels, Supriya Sule said to Chandrakant Patil- Dada let’s do our publicity now!


वृत्तसंस्था

मुंबई : बहुत बर्दाश्त किया, अब बर्बाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. याच अनुषंगाने आज संध्याकाळी चार वाजता ते मुंबईतील शिवसेना भवनात स्फोटक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

दुसरीकडे, आज पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी दोघांनीही आपल्या भाषणात राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. आम्ही आता चॅनलवर राहू मात्र, 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेकओव्हर करतील, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

तुम्ही तुमचं चॅनल आमच्या कॉमेंट्सवर चालवता. मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत असेही सुळे यावेळी म्हणाल्या. मात्र, आता जे काही करायचे आहे ते तीन वाजण्याच्या आत करू, 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तीन वाजेनंतर संजय राऊत यांचा सिक्सर असेल. त्यामुळे दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करू, असे सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाल्या.



यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे असा उल्लेख केला. नंतर मात्र, ते लोकसभेच्या खासदार म्हणाले. काल दत्ता मामा भरणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणाले. आज मी तुम्हाला असं बोललो असे पाटील म्हणाले. आज सकाळपासूनच सारे चॅनेलवाले मला विचारताहेत की संजय राऊत काय बोलणार. राऊत काय बोलणार हे मला कसं कळणार? असे पाटील म्हणाले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “संजय राऊत जी पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी आज का फोडू? आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाहीये, मला माहितीय ते कोण आहेत? पण जरा सस्पेन्स राहु देत. काही दीडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत.”

दरम्यान, पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर अरे सोड रे असं उत्तर राऊतांनी दिलं. गुजरातमध्ये बँकेचा मोठा घोटाळा झाला. त्याकडेही ईडीनं लक्ष द्यावं. तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. दोन वर्षे हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात एफआयआरदेखील झाला नाही. या घोटाळ्यात कोणाचे लागेबांधे आहेत, या प्रकरणातील सूत्रधार कसे पळाले याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

After three o’clock Sanjay Raut will take over all the channels, Supriya Sule said to Chandrakant Patil- Dada let’s do our publicity now!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात