विशेष प्रतिनिधी
पुणे : गेली अनेक वर्षे येरवडा कारागृहाचे अधीक्षक असलेले यू. टी. पवार यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Yerawada prison superintendent replaced abruptly
पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची कारागृह महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पवार हे गेल्या काही वर्षापासून येरवडा कारगृहाचे अधीक्षक म्हणून काम पहात आहेत. त्यांच्यावर यापूर्वी अनेक आरोप केले गेले होते. या बरोबर येरवडा कारागृहातील कामकाजाबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या.
शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या नियम ५ मधील तरतुदीचे पालन करुन यु. टी. पवार यांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App