प्रतिनिधी
मुंबई : देशभरात सध्या भोंग्यांसंदर्भात राजकीय वर्तुळात वाद सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर भोंग्याबाबत विधान करून मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात त्या समोर हनुमान चालिसा वाजवू, असे आव्हान दिले होते. यावेळी राज ठाकरेंनी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आता शेवटचा 1 दिवस बाकी असून भोंगे बंद झालेच पाहिजे, असे मनसेकडून ट्विट करून रिमाइंडर देण्यात आल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.With only 1 day left, the horns must be turned off
औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सभा घेतली त्यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा जाहीर इशारा दिला होता. ईदचा सण झाल्यावर आम्हाला मशिदींवरील भोंगे खाली उतरवलेले दिसले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले होते.
शेवटचा १ दिवस बाकी …#भोंगे pic.twitter.com/S74wB6tJYT — Gajanan Kale (@MeGajananKale) May 3, 2022
शेवटचा १ दिवस बाकी …#भोंगे pic.twitter.com/S74wB6tJYT
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 3, 2022
मनसेने दिला इशारा
त्यानंतर आता “फक्त एक दिवस बाकी आहे”, असे ट्विट नवी मुंबईचे मनसे अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी केले आहे. भोंगे बंद झालेच पाहिजेत. नाही तर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
– राज ठाकरेंचे ट्विट
सोमवारी राज ठाकरेंनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले, ३ मे रोजी ईद आहे. संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमके काय करायचे; हे मी उद्या ४ मे रोजी माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App