Winter session : १२ खासदारांचे निलंबन , संसद भवन परिसरात विरोधकांची निदर्शने

अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे.Winter session: Suspension of 12 MPs, protests by protesters in Parliament House premises


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळाल्याने या अधिवेशनाची सुरवात वादळी झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे.



या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना सदस्यांनी माफी मागितली तर कारवाई मागे घेतली जाणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संसद भवन परिसरामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत.

विरोधी पक्ष आक्रमक झाला असून या विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर आम्ही अधिवेशनावर बहिष्कार टाकू, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.

Winter session: Suspension of 12 MPs, protests by protesters in Parliament House premises

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात