प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येत जाऊ नये म्हणून ट्रॅप लावला कोणी? याचा खुलासा आता मनसेनेच केला आहे. Who set a trap against Raj Thackeray ??; Open your eyes
राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी केला होता. यानंतर राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच आता मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार ब्रजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केले आहेत. या ट्विटच्या माध्यमातून मनसेने अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप केला आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याआधी शऱद पवारांनीच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मनसेने शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या फोटोत ब्रजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमधला दिसत आहे.
"ब्रिज" चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे … ( फोटो झूम करून पाहावा…) pic.twitter.com/oYQZnMbM7Y — Gajanan Kale (@MeGajananKale) May 24, 2022
"ब्रिज" चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …
( फोटो झूम करून पाहावा…) pic.twitter.com/oYQZnMbM7Y
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 24, 2022
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
“अयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली. त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागील भूमिका रविवारी स्पष्ट केली होती.
अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो. मात्र राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने तिकडे जायचे ठरविले असते तर माझ्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक हिंदू बांधव आले असते. तेथे जर काही झाले असते तर कार्यकर्ते भिडले असते. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असते. त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला असता. ससेमिरा मागे लावला असता. हा सर्व संभाव्य प्रकार लक्षात आल्याने मी दौरा रद्द केला, असे स्पष्टीकरण राज यांनी दिले होते.
– मनसेची भूमिका
शरद पवारांबद्दल दिल्लीत घडलेली दुर्दैवी घटना किंवा केतकी चितळे प्रकरण असो राज ठाकरेंनी सर्व मतभेद, मनभेद बाजूला ठेवून समोर आले होते. दक्षिण भारतातही सर्व नेते एकत्र येतात. पण महाराष्ट्रात चुकीचे पायंडे पडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. या फोटोतून नेमके आम्हाला कुठे बोट ठेवायचे आहे आणि काय म्हणायचे आहे हे समजेल. मावळमधल्या २०१८ च्या कार्यक्रमातील हा फोटो असून सुप्रिया सुळेंच्या फेसबुक पेजवर आहे, अशी माहिती गजानन काळे यांनी दिली.
– राष्ट्रवादीकडून इन्कार
हा बालिशपणा म्हणायचा की पोरकटपणा? म्हणायचा मला कळत नाही. आम्ही कुठेच राज ठाकरेंबद्दल वक्तव्य केले नाही. सर्व सभांमध्ये त्यांनी शरद पवारांविरोधात वक्तव्य केले. त्यांच्याकडून महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिन्ही भाषणं पाहिली तर त्यांनी राष्ट्रवादीने, शरद पवारांना टार्गेट केले, असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सोडले.
राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर ब्रजभूषण सिंह यांनी विरोध केला. ते भाजपाचे खासदार आहेत, राष्ट्रवादीचे नाहीत. राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमने उधळली असताना ते मात्र यावर एक शब्द बोलले नाहीत. मुख्यमंत्री असताना राज्यात येणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा ते देऊ शकत होते. पण स्वत:च्या पक्षाच्या खासदाराला ते आवरू शकले नाहीत. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आम्ही सुरक्षा देऊ, सुखरुप नेऊ असा एकही शब्द काढला नाही, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App