100 वर्षांत महाराष्ट्र विधानपरिषदेने नेमके केले काय??, वाचा परंपरा, चर्चा आणि निर्णयांच्या वारशाचा इतिहास!!

Maharashtra Legislative Council

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विधान भवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेला 100 वर्षे पूर्ण होत असताना, या सभागृहातून संमत झालेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणांचे संकलन करणे हा अत्यंत दूरदृष्टीपूर्ण निर्णय आहे. देशातील ऐतिहासिक सभागृहांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राच्या विधानपरिषद सभागृहात अनेक महनीय व्यक्तींनी कार्य केले असून, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील दीर्घकाळ या सभागृहाचे सदस्य म्हणून योगदान दिले आहे. परंपरा, प्रथा आणि कायदे यांच्या आधारे विधानपरिषदेचे कामकाज चालले असले, तरी विविध काळात निवडून आलेल्या सदस्यांच्या अभ्यासपूर्ण चर्चांमुळेच हे सभागृह खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानपरिषदेतील प्रदीर्घ कार्यकाळातील महत्त्वपूर्ण योगदानाला देखील उजाळा दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, या सभागृहातील चर्चांमुळे कायद्यांना प्रगल्भता प्राप्त झाली असून, सामान्य नागरिकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा प्रतिबिंबित होण्याची संधी विधानपरिषदेतून मिळाली आहे. अशा परिवर्तनकारी निर्णयांचे दस्तऐवजीकरण होणे हे लोकशाहीच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारतात ऐतिहासिक दस्तऐवजीकरणाची परंपरा तुलनेने कमी राहिल्याने, आपल्या लोकशाही मूल्यांचा आणि विचारप्रणालीचा पुरेसा लेखाजोखा झाला नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. इतिहासाचे संकलन हे भविष्यासाठी दिशादर्शक ठरते. विधिमंडळाची प्रक्रिया, परंपरा आणि सभागृहातील संवेदनशील चर्चांचे संकलन येणाऱ्या पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या ग्रंथाच्या माध्यमातून विधानपरिषदेच्या शतकभराच्या वैचारिक आणि सामाजिक योगदानाचे दर्शन घडते. हा ग्रंथ अभ्यासक, विचारवंत, संशोधक आणि विधिमंडळात कार्य करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भ ठरेल.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

What exactly has the Maharashtra Legislative Council done in 100 years?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात