• Download App
    ममता - पवार आज दुपारी भेट; पंतप्रधानपदाचे दोन स्पर्धक भेटणार? की काँग्रेसला धक्का देण्याचा मनसूबा रचणार? |West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee will meet NCP chief Sharad Pawar in Mumbai today afternoon.?

    ममता – पवार आज दुपारी भेट; पंतप्रधानपदाचे दोन स्पर्धक भेटणार? की काँग्रेसला धक्का देण्याचा मनसूबा रचणार?

    नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दुसऱ्या दिवशीच्या महाराष्ट्र दौऱ्यात दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत. दुपारी तीन वाजता शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे ही बहुचर्चित भेट होणार आहे.West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee will meet NCP chief Sharad Pawar in Mumbai today afternoon.

    कालच ममता बॅनर्जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन “जय मराठा जय बांगला”चा नारा दिला आहे. आता शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्या कोणता नवा नारा देतात?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



    अर्थात ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे दोघेही पंतप्रधानपदाचे स्पर्धक आहेत. अर्थात त्यांची ही स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आहे त्याच बरोबर एकमेकांशी देखील आहे. त्यामुळे आजच्या भेटीमध्ये पंतप्रधानपदाचे दोन स्पर्धक भेटतात? की या बैठकीमध्ये आपल्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी काँग्रेसला धक्का देण्याची काही योजना बनवतात??, याकडे देखील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

    ममता बॅनर्जी यांच्या यांच्या राजकीय दौऱ्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर त्या ज्या राज्यांमध्ये जातील त्या राज्यांमध्ये त्या भाजप विरुद्ध तोंडी फैरी झडतात पण प्रत्यक्षात काँग्रेस पक्षातले नेते फोङून आपली तृणमूल काँग्रेस बळकट करतात. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासारखे दोन मजबूत प्रादेशिक पक्ष असताना तृणमूल काँग्रेसला प्रादेशिक पक्ष म्हणून विकसित व्हायला अवसर नाही.

    पण महाराष्ट्रात काँग्रेस जी चौथ्या क्रमांकावर आहे, तिला फोडण्यासाठी मात्र नक्की अवसर आहे. शरद पवार यांनी आधीच काँग्रेस पोखरून ठेवली आहे. त्यातला काही वाटा शरद पवार तृणमूल काँग्रेसला देतात का?, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात पवारांनी काँग्रेस पोखरताना त्यांचे पहिले प्राधान्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणे हे असणार आहे हे उघड आहे.

    पण तरीही राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात ते ममता बॅनर्जी यांना सहकार्य करणार का? की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असणारी मैत्री आयत्या वेळेला जागवणार? हा देखील कळीचा मुद्दा आहे. पण एकूण आजची दुपारची सिल्वर ओक वरची भेट राजकीयदृष्ट्या इंटरेस्टींग असणार आहे हे मात्र निश्चित!!

    West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee will meet NCP chief Sharad Pawar in Mumbai today afternoon.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!