नेटकऱ्यांची गाण्याला चांगलीच पसंती .
विशेष प्रतिनिधी
पुणे : ओटीटी विश्वात वेब सिरीज क्वीन म्हणून प्रसिद्धी असलेली मराठी अभिनेत्री मिथीला पालकर ही पहिल्यांदा घराघरात पोहोचली ते “ही चाल तुरुतुरु यामराठीतील प्रसिद्ध गाण्यामुळे तिने हे गाणं कप सॉंगथीम मध्ये तयार केलं. आणि अल्पावधीतच ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं . त्या गाण्याला लोकांची चांगली पसंती मिळाली . आणि सामान्य मध्यमवर्गीय असलेली मिथिला रातोरात स्टार झाली .आणि त्यानंतर कप सॉंग इज इक्वल टू मिथिला असं समीकरण झालं . web series Queen Mithila palkars new cup song viral..
मिथिलाने त्यानंतर अनेक वेब सिरीज मध्ये आणि चित्रपटातून देखील नितांत सुंदर अभिनय करत सुंदर काम केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकली..
सध्या मिथिला आणि गायक एबीवीने यांनी एकत्र येत अमीर खान आणि करीना कपूर यांच्या लालसिंग चड्डा या सिनेमातील ” तेरे हवाले कर दिया” हे ट्रेंडी गाण, कप सॉंग थीम मध्ये गायलं आहे.
View this post on Instagram A post shared by Abby V (@abbyvofficial)
A post shared by Abby V (@abbyvofficial)
हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे .मिथिला आणि एबीवीने गायलेल्या या गाण्याच्या नव्या कोऱ्या व्हर्जनच भरभरून कौतुक होत आहे ..या गाण्याला नेटकर्यांनी चांगलीच पसंती दिली आहे..सध्या या गाण्याला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून व्हिडीओला ३२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अशा “लिटलं लिटलं थिंग्स मुळेच आमचा दिवस आनंदी होतो” अशी नेटफ्लिक्स इंडिया ने या गाण्यावर कमेंट केली आहे.. या कप सॉंग ला चाहत्यांचे मिळणारे प्रेम पाहून एबी वीने, “आम्ही दोघे लवकरच आणखी एक गाणं तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत अशी घोषणा केली मिथिलाने केली आहे.”
मीथिला कायम आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्याच्या संपर्कात असते..आणि वेगवेगळे प्रयोग करत.. प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते ..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App