उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्लोटेल प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
मुंबई :- जलवाहतूकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटींग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. We will create floating jetty and other facilities to promote water transport promote tourism Deputy Chief Minister Devendra Fadnavis
मेघदूत निवासस्थान येथे फ्लोटेल प्रकल्पाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मदन येरावार, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री यांचे सचिव हे उपस्थित होते.
https://t.co/J82T0bHvuh — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 9, 2023
https://t.co/J82T0bHvuh
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 9, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात जलवाहतूकीस प्रोत्साहन देण्यात येत असून मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, पार्किंग, लॉन्स, प्रतिक्षालये व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील. याव्दारे पर्यटन विकासालाही अधिक चालना मिळेल. यांसारख्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. सर्व संबंधित विभागांनी यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App