• Download App
    WATCH : बीडमध्ये पावसामुळे येडेश्वरी कारखान्यातील साखरेची 30 हजार पोती भिजली । Watch In Beed 30000 bags of sugar got Wet in Yedeshwari factory due to rains

    WATCH : बीडमध्ये पावसामुळे येडेश्वरी कारखान्यातील साखरेची 30 हजार पोती भिजली, लाखोंचे नुकसान

    Yedeshwari factory : मुसळधार पावसाने येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामातील 30 हजार साखरेचे पोते पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे. कारखान्याचे संचालक बजरंग सोनवणे यांनी माहिती दिली. बीडच्या केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने, 30 हजार साखरेचे पोते पाण्यानं भिजली आहेत. यामध्ये पंधरा हजार क्विंटल साखर भिजल्याने लाखोंचं नुकसान झालंय. येडेश्वरी साखर कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केलं होतं. आणि हीच साखर पॅकिंग करून गोदामात स्टोअर करण्यात आली होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने कारखान्याच्या गोदामातील सर्व साखर भिजून गेलीय. गोदामातील पाणी काढण्यासाठी 40 ते 50 कामगार प्रयत्न करत होते. अर्ध्या तासात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. सध्या पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. Watch In Beed 30000 bags of sugar got Wet in Yedeshwari factory due to rains

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Neelam Gorhe : पालघर अत्याचार प्रकरणात न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू; ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक व शैक्षणिक मदत मिळणार- डॉ. नीलम गोऱ्हे

    Uday Samant : भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द; मंत्री उदय सामंत यांची माहिती; राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदीची करण्यात आली होती सक्ती

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा; विधानसभेवर निवड झाल्याने सोडली खासदारकी