Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt : महाराष्ट्रामध्ये तिघांचे सरकार आहे आणि तिघेही लबाड आहेत. या तीन लबाड पक्षांना भाजपला सामोरे जायचे आहे. आक्रमक झाल्याशिवाय शिवसेनेला कळत नाही. आम्ही त्या औलादींना ओळखतो. त्यांना तीच भाषा कळते, अशी खरमरीत टीका नीलेश राणे यांनी केली. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते. नीलेश राणे पुढे म्हणाले की, तो एक बिनकामाचा संजय राऊत बसलाय.. रोज उठून जॅकेट घालून तोच पत्रकार, तोच दांडा, त्याला दुसरे कामच नाही. पीआर एजन्सी काम करते. महाविकास आघाडी नाही, अशी टीका राणे यांनी केली. शिवसेना नुसती बोंबाबोंब करत असते. एवढ्या वर्ष तेच केले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणूस किती राहिला आहे. मुंबई पालिका म्हणजे शिवसेना, त्याचा काय धंदा आहे. उद्धव ठाकरे कुठे धंद्यावर बसला आहे का. काय धंदा म्हणजे मुंबई पालिका अशी टीकाही त्यांनी केली. Watch BJP Leader Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App