विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यनगरीत सामूहिक बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्या विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. वानवडी येथे नुकतीच १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. Wanavdi gang rape incident ; Angry Public protest in Pune
गेले १० दिवसात पुण्यामध्ये सामुहिक बलात्काराचे भयानक प्रकार वाढत आहेत, जनता वसाहतीमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर काल वानवड़ीमध्ये १४ वर्षाच्या मुलीवर ही सामूहिक बलात्कार झाला.
आज मुलींना बाहेर पाठवायला ही लोक घाबरत आहेत, समाजातील ही विकृति आहे, डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या वतीने पुणे रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराकडे आणि रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेसंदर्भात यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीय लोक स्टेशनवर आले होते
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App