बॅकलॉग भरून काढायला सुरुवात; केंद्राचे लाभ मिळणार राज्यात; पेट्रोल डिझेल होणार स्वस्त!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे पवार सरकार जाऊन शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर बॅकलॉग भरून काढायला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलेले लाभ आणि कर सवलती महाराष्ट्रात देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याबरोबरच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावासाठी 21 कोटी रुपये निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. VAT on petrol diesel to be reduced soon, announced eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वास दर्शक ठराव संमत झाल्यानंतर आपल्या अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना ही घोषणा केली. केंद्र सरकारमध्ये पेट्रोल डिझेल वरील उत्पादन आणि आयात शुल्क कमी केले. त्यानुसार काही राज्यांनी आपल्या राज्यातील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कमी केले. त्याचा लाभ संबंधित राज्यांमधल्या जनतेला झाला. परंतु, महाराष्ट्रात आधीच्या सरकारने व्हॅट कमी केला नव्हता. तो आता आमचे सरकार करेल, असे एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले. यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून मान्य करून घेतला जाईल आणि जनतेला पेट्रोल डिझेल स्वस्तात उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

– हिरकणीच्या गावासाठी 21 कोटी

त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील हिरकणीच्या गावाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

VAT on petrol diesel to be reduced soon, announced eknath shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात