वृत्तसंस्था
पुणे : जानेवारी २०२२ पर्यंत सर्व पुणेकरांचे पूर्ण लसीकरण होणार आहे. त्यांना कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस दिले गेले असतील, असा दावा महापालिकेने केला आहे. पुण्याची लोकसंख्या ३० लाख ९९ हजारांच्या आसपास असून त्यापैकी १० लाख ४६ हजार जणांना दोन डोस दिले आहेत. २० लाख ९८ हजार जणांना पहिला डोस दिला गेला आहे. लसीचा वेळेवर पुरवठा होत असून हेच सातत्य कायम राहिल्यास पुणेकरांचे लसीकरण जानेवारीतच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. Vaccination of all Pune residents will be completed in January; NMC claims that so far 10 lakh 46 thousand people have been given two doses
संपूर्ण लोकसंख्येला लसीचा पहिला डोस दिला असला तरी दुसरा डोस देण्यासाठी ८४ दिवस थांबावे लागणार आहे. त्यामुळे पूर्ण लसीकरण करता येणे शक्य असताना ते करता येत नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम ही जानेवारी २०२२ पर्यंत चालणार आहे. बजाज ग्रुपकडून सोमवारी एक लाख डोस पालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लसीकरण अधिक वेगाने करता येणे शक्य झाले आहे. अनेकांनी लस दिली गेल्याने कोरोना मृत्यू आणि तो होणे यात प्रचंड घट झाली आहे. हा लसीचा मोठा फायदा ठरला आहे.
पुण्यात १६ जानेवारी २०२० मध्ये लसीकरण सुरु झाले. १८ वर्षांवरील ४२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून ८५.७२ टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. आगामी चार महिन्यात सर्व पुणेकरांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. २९ सप्टेंबर अखेर २० लाख ९८ हजार जणांना लसीचा पहिला डोस दिला आहे. ऑक्टोबरच्या माध्या पर्यंत पुण्याच्या अर्ध्या लोकसंख्येचे लसीकरण मार्गी लागणार आहे.
Vaccination of all Pune residents will be completed in January; NMC claims that so far 10 lakh 46 thousand people have been given two doses
महत्त्वाच्या बातम्या
- बेरोजगार कन्हैयाकुमारकडे १८ कोटी रुपयांची संपत्ती, खर्च चालवितात कसा हा देखील प्रश्न
- राहूल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या माध्यमांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी धमकावले, गुंडगिरी असल्याचा नेटीझन्सचा आरोप
- फी माफीसाठी विद्यार्थ्यांवर डोके आपटून घेण्याची वेळ, रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी महाविद्यालयात घटना
- कंगणाने पुन्हा करण जोहरला केले टार्गेट!