• Download App
    महिला रेल्वे प्रवाशाचे प्राण पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले; कल्याणमध्ये धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न । Police constable rescues female train passenger; Attempt to get off the train in Kalyan

    महिला रेल्वे प्रवाशाचे प्राण पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले; कल्याणमध्ये धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रेल्वे फलाट वरून रवाना होत असताना एक महिला खाली उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पडली. ती रेल्वे खाली जाण्याचा धोका निर्माण झाला असताना पोलिसाने तात्काळ धाव घेऊन तिला वाचविले. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. पोलिस कॉन्स्टेबल मंगेश थेर यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. Police constable rescues female train passenger; Attempt to get off the train in Kalyan

    याबाबतची हकीकत अशी. कल्याण स्थानकात कामायनी एक्स्प्रेस बुधवारी सकाळी आली. निर्धारित वेळेत ती सुटली. पण, आपण चुकीच्या रेल्वेत बसल्याचे तुनुगुंटला अरुणा रेखा ( वय ६२, रा. ठाणे) यांना उमगले. त्यामुळे त्या रेल्वे सुटली असताना खाली उतरल्या. त्यांनी प्रथम आपली बॅग फलाटवर टाकली.



    त्यानंतर त्या फलाटावर उतरताना तोल जाऊन कोसळल्या. ही बाब पोलिस कॉन्स्टेबल मंगेश थेर यांच्या लक्षात आली. त्यांनी धाव घेऊन त्यांना रेल्वेखाली असलेल्या मोकळ्या जागेत जाण्या पासून रोखले आणि तातडीने बाहेर काढले. त्यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. खरे तुनुगुंटला यांना कोणार्क एक्स्प्रेसने प्रवास करायचा होता. पण, त्या गडबडीत कामायनी एक्सप्रेसमध्ये बसल्या होत्या. अखेर त्यांना मंगेश थेर यांनी कोणार्क एक्सप्रेसमध्ये बसवून दिले. अरुणा यांनी थेर यांच्याबरोबर रेल्वेचे आभार मानले आहेत. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी धावत्या रेल्वेत चढू अथवा उतरू नये, असे आवाहन रेल्वेने पुन्हा एकदा केले आहे.

    • महिला रेल्वे प्रवाशाचे प्राण कॉन्स्टेबलने वाचवले
    • कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना
    • धावत्या रेल्वेतून महिला खाली उतरताना पडली
    • रेल्वेखालच्या मोकळ्या जागेत जात होती
    • पोलिस कॉन्स्टेबल मंगेश थेर यांनी धाव घेतली
    • महिलेला रेल्वेपासून दूर करून प्राण वाचविले
    • तुनुगुंटला रेखा या चुकून दुसऱ्या रेल्वेत बसल्या
    • लक्षात येताच त्या रेल्वेतून खाली उतरत होत्या

    Police constable rescues female train passenger; Attempt to get off the train in Kalyan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!